जळगाव ;- जिल्हा रुग्णालयसमोर लावलेली दुचाकी आणि गोपाळपुरा येथील दुचाकी अज्ञात चोरटयांनी लांबविल्याच्या घटना घडल्या असून दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि , अनिल श्रीराम महाजन (वय-५२) रा. न्यू इंदीरा नगर, बऱ्हाणपुर मध्यप्रदेश हे शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी ४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता दुचाकी (एमपी ६८ एमए ८२८) ने आले. त्यावेळी त्यांनी त्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी रूग्णालयाच्या गेट समोर पार्कींगला लावून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. दुपारी १२.३० भेटून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईका प्रविण भोसले करीत आहे.
दुसऱ्या घटनेत गोपाळपुरा हनूमान मंदीरासमोर तरूणाची पार्किंगला लागवलेली ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन करीत आहे.







