जळगाव (प्रतिनिधी) – टायगर ग्रुप मार्फत पै.तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व पै.ऋशिकेश बाबा भांडारकर टायगर ग्रुप खान्देशचे अध्यक्ष यांच्या मार्ग दर्शनाखाली शिरसोली येथील टायगर ग्रुपचे सदस्य प्रमुख श्री. बंटी भाऊ यांच्या वाढदिवस औच्युत्य साधून होतकरू व गरीब लोकांना कोरोना महामारीची चैन साखळी कमी करण्यास काही अंशी हातभार म्हणून बंटी भाऊ यांच्या हस्ते वाढदिवस निमित्त शिरसोली प्र. बो. येथील भिल्ल समाजास मास्कचे वाटप करून त्याचे फायदे व महत्व पटवून देऊन स्वच्छता संबंधी सूचना करत मास्कचे वाटप करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता ग्रुपचे सदस्य मोहन ठाकरे, कुणाल बारी, हर्षल सुरवाडे, फिरोज तडवी, गणेश वानखेडे, हेमंत(रावसाहेब) पाटील, गौरव उमप, मनोज बाविस्कर आदिंनी परिश्रम घेतले होते.