चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- कै.सोमनाथ महाराज नाईकवाडे हातगावकर यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये मदत व मुलीचे लग्न होईपर्यंत दरवर्षी १० हजार रुपये देण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले असून वारकरी कुटुंब संकटात असताना वारकऱ्याचा मुलगाच आला धावून अशी प्रतिक्रिया तालुकावासीयांमध्ये व्यक्त होत आहे.

ह.भ.प. सोमनाथ महाराज नाईकवाडे, हातगावकर यांचे निधन ही चाळीसगाव तालुक्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची हानी आहे, मी देखील वारकऱ्याचा मुलगा आहे, संकटात असणाऱ्या वारकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही.अशी प्रतिक्रिया आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.







