जळगाव (प्रतिनिधी ) ;-महाराष्ट्रमध्ये रक्ताचा साठा अत्यंत कमी असल्यामुळे राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्ण कार कारागीर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी कामगार दिनानिमित्त रेड प्लस बँक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी कोरोना लस घेण्या अगोदर रक्तदान व कोरोना आजारातून बरे होऊन आलेल्यांना प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले. यावेळी शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून रक्तदानास सुरुवात केल. १५ बॅग संकलन केले यावेळी रेड प्लस ब्लड बँकचे डॉ. भरत गायकवाड , राष्ट्रीय हिंदु सुरक्षा सेना जिल्हाध्यक्ष मयूर बारी, उत्तर महाराष्ट्र प्रभारी विशाल शर्मा,राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना जिल्हाउपाध्यक्ष विवेक महाजन, सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्ण कारागीर संस्था जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप सोनार, जिद्दी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री मुनेश बारी, युवाशक्ती फौंडेशनचे सचिव अमित जगताप, समाजसेवक शंकर भाऊ अहिरराव, सागर बागुल, प्रकाशभाऊ सपकाळ आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना, सचिव प्रदीप सोनार, रोहित शर्मा हेमंत सोनवणे, शुभम वाघ, मयुर तिवारी, रोहित तिवारी, मनीष वाणी, दिनेश माने, उदय शिंपी, न्यानेश्वर सोनार, गणेश पंडित, आदिचे सहकार्य लाभले.







