भारत सरकारनी विनंती ऐका आते , तुम्ही घरमाच बसान बरका ; शाहिराचे गीत होतेय सोशल मिडियावर वायरलर
पाचोरा- जगभरात कोरोनाने हाहाकार माजला आहे. भारत 8 ते 10 दिवसापासून लोकडॉउन असून आपण आपल्या घरातच सुरक्षित राहा असे प्रशासन व पोलिसांच्या जीव तोडून सांगत आहे. तरी देखील लोक मात्र ह्या आजाराला अजून पर्यंत गांभीर्याने घेतलेले नाही. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर आजही लोक दिसत आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणारे गीत हे पाचोरा येथील शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी स्वताः तयार करुन ते सादर केले. विठ्ठल महाजन हे माळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद जिल्हा संघटक या पदावर आहेत. त्यामुळे आता तरी भारत सरकारने दिलेले आदेश पाळावे व घरातच आपण सुरक्षित राहण्याची गरज आहे.असा जणू संदेश या गीतात दिला जात आहे. शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी कोरोनाच्या जनजागृतीर अहीराणी भाषेत अप्रतिम गीत तयार केले आहे. त्यातुन शहरी भागासह ग्रामीण भागात लोकांना कोरोना बद्दल जनजागृती करण्यास निश्चित मदत होईल.