पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा येथील मुख्य बाजारपेठेतील भुयारी गटार ही नगरपालिकेने खोदून तशीच ठेवल्याने शहरातील नागरिकांसह दुकानदारांना याचा त्रास होत आहे.
पारोळा शहरातील मुख्य बाजार पेठेतील भुयारी गटार ही नगरपालिकेने दि.४ एप्रिलपासून खोदून त्याच्यातल्या दगड, विटा, माती,घाण कचरा इत्यादी काढून रस्त्यावरच टाकला आहे, तर बंदिस्त असलेली गटार ही उघडी ठेवली आहे. जवळपास २महिन्यांनंतर ही सदरची घाण, दगड माती रस्त्यावर पडलेले आहेत. यामुळे बाजार पेठेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आणि बाजारातील दुकान दुकानदारांना याचा त्रास होतोय.
सध्या कोरोना मुळे शासन स्वच्छते साठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून पारोळा नगरपालिकेला बाजारपेठेतील हे घाणीचे साम्राज्य दिसत नाही का , असा प्रश्न सर्वसामान्यना पडला आहे.







