नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- देशातील करोनाची स्थिती हाताबाहेर गेली असताना आणि वैद्यकीय सामग्रीचा तुटवडा भासत असताना भारताला परदेशातून मदत मिळाली आहे. यातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताला थेट लस पुरवठा केला जाण्याचे संकेत दिले आहेत.

यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला मोठा फटका बसलेला असून दिवसागणिक रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. यामुळे अमेरिकेने सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या नागरिकांना भारत सोडण्यास सांगितले आहे.
भारतातील सद्य स्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे. याबाबत इंग्रजी वृत्तात सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, नागरिकांनी भारतात जाऊ नका किंवा लवकरात लवकर भारत सोडा असा मेसेज जाहिरातीद्वारे सांगण्यात येत आहे. तात्काळ भारत सोडणे हाच सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य पर्याय असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या सीडीसीने म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं होत असणारी वाढ लक्षात घेता देशातील नागिरिकांनी भारतात कोणत्याही प्रकारचा प्रवास करण्यापासून दूर रहावं. इतकंच नाही तर लस घेतलेल्या प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा आणि संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे भारतात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळाच असंही म्हटलं आहे. असा सल्ला अमेरिकेचा नागरिकांना दिला जात आहे.







