मुंबई (वृत्तसंस्था) ;- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून त्यांनी स्वत: क्वारंटाईन केले आहे. कोरोना बाधितांच्या परिवारांना भेटी दिल्या तेव्हा मी त्यांच्या संपर्कात आले. माझ्या सोबत असणाऱ्यांनी टेस्ट करुन घ्या असे त्यांनी म्हटले आहे.








