पणजी : – राज्यातील कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या, गुरुवारपासून चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. गुरुवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.

राज्यात कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. विविध स्तरांतून तसेच विरोधी पक्षासह आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी लॉकडाऊनची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली होती. बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या सुविधा सुरु असतील. जे पर्यटक हॉटेलमध्ये उतरले आहेत त्यांनी चार दिवस हॉटेलमध्येच रहावे असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.
एप्रिल महिन्यात राज्यातील कोरोनोमुळे मृतांचा आकडा सव्वादोनशेच्या वर पोहोचला आहे. त्याशिवाय राज्यात १६ हजार ५९१ रुग्ण आहेत.







