जळगाव;- पिंप्राळा परिसरातील गुलशन रजा कॉलनी भागात राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून आज पोलिसांनी कब्रस्थानातून ११ वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून कळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

जावेद अख्तर शेख हा मोठी मुलगी कनीज फातेमा हिला अपशकुनी असल्याने छळ करून जीवे ठार मारून कब्रस्थानात दफन केल्याची खळबळजनक तक्रारीवरून रामानंद नगर पोलीसात आईवडीलांवर संशयास्पद मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. आज बुधवारी सकाळी दफन केलेल्या कब्रस्थानातून मृतदेह काढून पंचनामा केला असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवारी कनीजच्या आईवडीलांची पोलीस अधिकक्ष डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमारचिंथा यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. दरम्यान आज बुधवारी सकाळी ९ वाजता कब्रस्थानात दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीसांसह डॉक्टरांनी पंचनामा केला असून आता अहवालकडे लक्ष लागले आहे .







