बालिकेचा परस्पर केला दफनविधी ; बुधवारी मृतदेह उकरून होणार शवविच्छेदन

जळगाव ;-येथील खंडेराव नगर हुडको परिसरातील गुलशन रजा कॉलनी येथे राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने तिचा दफनविधी परस्पर उरकून घेतल्याचा संशय मुलीच्या मामा आणि आजोबा यांनी रामानंद नगर पोलिसांकडे व्यक्त केल्याने मुलीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कुसुंबा येथील डबल मर्डर प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आता नव्याने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याच्या संशयाने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बुधवारी वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शविच्छेदन करण्यात येऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया आज दिवसभर सुरु असल्याने बुधवारी सोपस्कार पार पडतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुलशन रजा कॉलनी येथे ११ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहत होती . या मुलीचा २३ एप्रिल रोजी आकस्मीक मृत्यू झाला. तिच्या पालकांनी कुणालाही माहिती न देता तिच्या पार्थिवाचे दफन केले.
नात आणि भाचीचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती तिचे आजोबा (आईचे वडील) व मामा यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिल्याने चौकशी करिता मुलीचे आई वडील यांना बोलविण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकायांनी दोघांची कसून चौकशी केली. मात्र दोघांच्या बोलण्यात ताळमेळ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कुठेतरी पाणी मुरतंय या संशयाला बळकटी मिळत असल्याचे बोलले जात असून मयत मुलीचे आईवडील उच्च शिक्षित असून पहिली मुलगी झाल्याने ती अपशकुनी असल्याचे मत वडिलांचे झाल्याने ती ‘नकोशी ‘ झाली असल्याने हि ‘बला’ कशी जाईल या विचारात मग्न असलेल्या मात्यापित्याने मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची चर्चा दिवसभर परिसरात सुरु होती . दरम्यान मृतदेह उकरून मृतदेहाच्या शवविच्छेदनावरून मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजणार आहे .







