बंगळुरू (वृत्तसंस्था ) ;- कोरोनाने मनोरंजन विश्वातील आणखी एक बळी घेतला. कन्नड सिनेमसृष्टीतील दिग्गज निर्माते रामू यांचे कोरोनामुळे निधन झाले. 52 वर्षांच्या रामू यांनी सोमवारी संध्याकाळी बेंगळुरू येथे अंतिम श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी मालाश्री व दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कन्नड सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते.








