नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित झालेले लोकांमुळे त्यांचे नातेवाईक कोरोना संक्रमित होत आहेत. ते उपचारांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. वाढत्या मागणीमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाला आहे. रुग्णाचे नातेवाईक वाट्टेल ती किंमत मोजून इंजेक्शन मिळवण्यासाठी तयारी दाखवत आहेत. मात्र, या इंजेक्शनचा कोणताही महत्त्वाचा फायदा नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघनटेने देखील अधिकृत मान्यता दिलेली नाही. जसे इतर एंटीबायोटिक औषधे खाल्ल्यानंतर सात दिवसांनी फरक पडतो, तसेच या इंजेक्शनचे देखील आहे.
रेमडेसिविर प्रभावी नाही
रिसर्च सोसायटी ऑफ इनेस्थीया एंड क्लीनिकल फार्माकोलॉजीचे सचिव आणि संजय गांधी पीजीआयचे आयसीयू एक्सपर्ट्स संदीप साहू यांनी सांगितले की, रेमडेसिविरच्या मागे धावण्यात काहीही अर्थ नाही. डॉक्टरांनी देखील रुग्णांना यासंदर्भात समजावून सांगितले पाहिजे. हे इंजेक्शन कोरोना संक्रमित रुग्णामध्ये रोखण्यात प्रभावी नसल्याचे साहू यांनी सांगितले.
‘डेक्सामेथासोन’ हे औषध स्वस्त आणि प्रभावी
न्यू इंगलंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अहवालाचा हवाला देत साहू यांनी सांगितले की, ‘डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, त्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन प्रभावी ठरते. 8 ते 10 मिलीग्राम औषध 24 तासांनी दिल्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडत नाही.’
ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 90 पेक्षा कमी होते आणि ‘डेक्सामेथासोन’ दिल्यानंतर 28 दिवसानंतर, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे आणि व्हेंटिलेटरची गरज भासली नसल्याचे निष्कर्षावरुन दिसून आले. शास्त्रज्ञांनी दोन हजार कोरोना संक्रमीत रुग्णांवर हे संशोधन केले आहे. रेमडेसिविर केवळ एका विशिष्ट श्रेणीमध्ये आराम देते. या औषधाचा कोणताही खुला अभ्यास नसून फक्त फार्मा उद्योगाद्वारे प्रायोजित केलेल्या संशोधनातून हे पुढे आले आहे.
संदीप साहू यांनी सांगितले की, आयसीयूमध्ये दाखल केलेल्या कोरोना नसलेल्या रुग्णामध्ये एआरडीएस रोखण्यासाठी ‘डेक्सामेथासोन’ प्रभावी ठरले आहे. हजारो रुग्णांमध्ये हे पाहिले देखील गेले आहे. या औषधाची योग्य मात्रा दिल्यानंतर सायटोकिन स्ट्रोम्स थांबवण्यात मदत होते