पारोळा (प्रतिनिधी)तारीख २१ – एक वर्षापासून ग्रंथ व्यवहारा सह मुद्रक प्रकाशक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत ग्रंथालयांना तुटपुंजे अनुदान मिळत असून ग्रंथव्यवहार जीवनावश्यक बाब म्हणून विचारात घ्यावी अशी मागणी ग्रंथालय संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे .
कराेना संसर्गजन्य परिस्थितीत मागील वर्षभरापासून निर्बंध ठेवण्यात आले आहेत . दरम्यान काळात ग्रंथालय ,मुद्रक ,प्रकाशक ,कागद विक्रेते ,बाइंडर ,वितरक यांच्या आर्थिक नियोजन कोलमडले आहे . निर्बंधाच्या काळात ऑनलाइन विविध खरेदी सह पुस्तक, पीडीएफ फाईल नव्या टेंडरला मोठी पसंती वाचक रसिकांनी दिली. अशा बदलाचा मोठा परिणाम ग्रंथ व्यवहारावर झाला आहे. पुस्तक प्रकाशन आणि विक्रेते यांनी बदलत्या परिस्थितीत सावध भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे . दुसरीकडे ग्रंथालयांना मिळणारे अनुदान तुटपुंजे आहे . ग्रंथ विक्रीचा व्यवहार मंदावला आहे प्रकाशन व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे प्रकाशकांनी सांगितले . वर्षापासून ग्रंथव्यवहार यावर अवलंबून असलेले चित्रकार, वितरक ,मुद्रितशोधक, श्रमजीवी, सहाय्यक ,छपाई मशीन वर काम करणारे कारागिर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत . एक वर्षापासून ग्रंथ व्यवहारावर मोठा परिणाम दिसून येत आहे .ग्रंथालय कशी चालवावी असा प्रश्न आहे . मिळणारे अनुदान तुटपुंजे असल्याने सध्याच्या परिस्थितीत ग्रंथव्यवहार जीवनाश्यक बाब म्हणून मानायला हवे असे त्यांनी सांगितले.








