जळगाव ;- शहरातील चोपडा मार्केटमधील भारद्वाज ट्रेडर्सच्या रिकाम्या खोलीत बेकायदेशीर विदेशी बनावटीच्या व कालबाह्य असलेल्या सिगारेटची विक्री करणाऱ्या ६ जणांना कारवाई करत ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बुधवारी सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने ही कारवाई केली. नवीन बसस्थानक परिसरातील भारद्वाज ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या शेजारी रिकाम्या खोलीत काही जण बेकायदेशीर बनावट विदेशी व कालबाह्य झालेल्या सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती चिंथा यांना मिळाली हाेती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, मनोज पवार, महेंद्र बागुल, प्रशांत पाठक, विकास पहूरकर, विनोद पाटील आदींनी हि कारवाई केली .








