नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. मंगळवारी देशात गेल्या 24 तासात 2 लाख 56 हजार करोनाबाधित आढळले आहेत. तर 1757 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.
डाॅ. हर्षवर्धन म्हणाले, आज सकाळपर्यंत 12,71,00,000 हून अधिक नागरिकांनी करोनांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मृत्यू दर 1.18 टक्के आहे जो लागोपाठ कमी होत आहे. दोन दिवसांपूर्वी देशात 1.93 टक्के लोक आयसीयू बेडवर होते. तर आज ते प्रमाण 1.75 टक्के आहे. परवा व्हेंटिलेटवरवर 0.40 टक्के लोक होते आजही तेवढेच आहेत.
दरम्यान, जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास करोनाचा संसर्ग कमी होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच इस्त्राईल आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जास्त प्रमाणात लसीकरण झाल्याने दोन्ही देश करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतही लसीकरणामुळेच करोना आटोक्यात आला आहे.
नुकतेच अमेरिकेत 16 वर्षांवरील लोकांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारतात देखील 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना करोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास भारतातूनही लवकरच करोना हद्दपार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.