मुंबई (वृत्तसंस्था) ;- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती आहे.