मुंबई (वृत्तसंस्था ) ;- वाढत्या करोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची निकडही वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात द्रवरूप ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन सिलिंडर राज्यात येणार आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचा साठा विथाअडथळा विविध शहरात पोहोचावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला असून या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.