नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार राजकारण रंगलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची जोरदार खिल्ली उडवली आहे. फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय.

‘उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? रेमडेसिव्हीर राज्यसरकारलाचं देणार होते. संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं. माहिती तर घ्यायची आधी. सरकार म्हणतं सहकार्य करा. आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे’ असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या मागणीची खिल्ली उडवली आहे.







