भुसावळ;-तालुक्यातील साकेगाव येथे राहणार शेतकरी हा आपल्या शेतात जात असताना अचानक दुचाकीवरून तीन जणांनी येत मारहाण करून त्यांच्याकडील रोकड, सोन साखळ्या आणि मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून भरदिवसा हि घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे .
याबाबात सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , साकेगाव येथील विनोद परदेशी हे इसम सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असतांना तीन इसामानी मोटरसायकल वर येऊन अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्या कडील ८० हजार रुपये रोख,दोन सोन्याच्या चेन, एक विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व त्यांच्या सहकार्यांनी पोहचून तपास सुरु केला असून भुसावळच्या एका संशयितांवर पोलिसांचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहे .







