मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशात मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी असे खुले आव्हान भाजपाने दिले आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत नवाब मलिक यांना आव्हान दिले आहे.ट्विटमध्ये त्यांनी, नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं असं त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी. किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यास रोखले असंही केशव उपाध्ये म्हणाले.







