वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – काल पुर्वसंधेला चोपडा तालुका तहसिलदार अनिल गावित साहेब व तालुका कृषीअधिकारी, भैय्यासाहेब देसाई आणि शेतकरी संघटनेचे ,माजी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष याच्यात शेतकरी पिक विम्या, संदर्भात मिटींग संपन्न झाली.

केळी पिक विमा संदर्भातील शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे यासंदर्भात काल तहसीलदार साहेबांसोबत मिटींग होती मिटिंग मध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे असं परखड मत तहसीलदार साहेबांनी मांडले. तसेच तहसीलदार साहेबांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यातील जेवढे पीक विम्याचे शेतकरी बाकी आहेत. त्यांची पूर्ण माहिती गोळा करून परत आपण विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पाठवणार आहोत. जेणे करून कोणीही वंचित राहणार नाही व पिक विम्याचा लाभ सर्व शेतक-यांना मिळेल.
येणाऱ्या दिवसात विमा कंपनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहून मगच पुढची रणनीती ठरऊन शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येणार आहे, मीटिंगमध्ये माननीय, अनिल गावित साहेब तहसीलदार चोपडा, भैय्यासाहेब देसाई, तालुका कृषी अधि.चोपडा साळुंके साहेब व शेतकरी संघटनेचे, संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष, किरण गुर्जर उपजिल्हाध्यक्ष, सचिन शिंपी तालुका अध्यक्ष असे सर्व जण उपस्थित होते व येणाऱ्या वीस तारखेला तहसीलदार साहेबांनी परत मीटिंग बोलावली आहे. त्यावेळी पुन्हा या विषयांवर चर्चा करणार आहेत.







