जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांच्या सर्वेक्षणातील आवश्यक असलेले ९ निकष पुर्ण करून आणि तंबाखू मुक्त शाळेचे प्रमाणपत्र प्राप्त करून मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर ही शाळा ठरली जळगांवातील सर्वांत पहिले तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आले.

प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर , उपक्रमशील शिक्षक, चित्रकार,पर्यावरण मित्र, तंबाखू मुक्त अभियान प्रमुख शिक्षक सुनिल दाभाडे यांनी उत्कृष्ट नियोजन करून तसेच तांत्रिक सहकार्य करून शाळेचा मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी परिश्रम घेऊन १००% शाळा तंबाखू मुक्त ठरली आहे.
यात प्रभात फेरी, तंबाखू मुक्त रॅली, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसरातील दुकानांना भेटी, सर्व शाळेचा स्टेशनरीवरील संदेश, घोषवाक्य, प्रतिज्ञा, शाळेचा दर्शनीय भागात तंबाखू मुक्त क्षेत्र शाळा- फलक आदि उपक्रम राबविण्यात आले आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांचे कडून तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आली आहे आणि संपुर्ण शाळा सन २०२१-२०२३ असे २ वर्षासाठी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डाॅ.आर. एस. डाकलियाजी, सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अभिनंदन केले. प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, शिशु मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग सहकार्य लाभले.
या कामी सलाम मुंबई फाऊंडेशन जिल्हा समन्वय जयेश माळी, साने गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य केले.







