जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील मुळीक हॉस्पिटल समोरून नशिराबाद येथील तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल नथ्थु देवळे (वय-३८), रा. नशिराबाद, ता.जि.जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहरातील मुळीक हॉस्पिटल येथे आला होता. काम आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास (एमएच १९ बीझेड ४७३५) क्रमांकाची दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली असता मिळाली नाही. अनिल देवळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्त वागळे करीत आहे.







