जळगाव (प्रतिनिधी) – काल सायंकाळपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाला मोबाईल रिपेयरिंग असोसिएशनतर्फे विरोध दर्शविला आहे. सोमवारपर्यंत इतर व्यावसायिकांना दुकान उघडे ठेवण्याचा आदेश दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता मार्केट बंद केल्यामुळे व्यापारी वर्ग मोठा संकटात सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकरांचे पगार कसे करायचे? बँकेचे हप्ते थकीत असून लोनची परत फेड कशी करायची ? दुकानाची भाडे कशी भरायची ? आमच्याकडे कर्मचारी वर्ग कामाला असून त्यांच्या पगाराची जबाबदारी आमच्यावर असते. या लॉकडाऊनला आमचा विरोध असून शासनाने आम्हाला विश्वासात घेऊन दुकाने उघडण्याची परवानगी दयावी अशी मागणी गोलाणी मार्केट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी जितेंद्र लुल्ला, महेश चावला, दीपक कुकरेंजा, जव्हारलाल ललवाणी, सुरेश लुल्ला, मनीष कुकरेजा, कैलास कावणा, चेतन कासार, राकेश पाटील, राहुल सोनवणे, शुभम मराठे, दीपक मधान, असिफ खान, सुनील मकडीया, लखन कुकरेंजा, रोहन पाटील, मिलिंद सोनवणे, प्रविण चौधरी, विकी वाध्वानी आदी उपस्थित होते.







