मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज परत एकदा डिजिटल माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला आहे. आज बोलतांना त्यांनी सर्वात अगोदर सोलापूरच्या आराध्या नावाच्या 7 वर्षीय चिमुकलीचे त्यांनी केले आहे. या 7 वर्षीय चिमुकलीने वाढदिवसानिमित्त कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देऊन समाजासमोर एक चांगले उदाहरण मांडले आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी या चिमुकलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि तिचे आभार मानतो. तसेच कोरोना व्हायरस हा जात, पात, धर्म पाहत नाही त्यामुळे सर्वांनी जात पात धर्म बाजूला ठेऊन सरकारला सहकार्य करावे. तसेच समाजामध्ये शांतता ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. त्याच वेळी, हॉटेल ताज आणि ट्रायडंटने सुद्धा मदत दिली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननेही आपल्या ऑफिसला जागा दिली आहे. बरेच लोक मदतीसाठी पुढे येत असल्याचे सुद्धा त्यांनी म्हंटले आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती परसवणाऱ्याविरोधात बोलतांना त्यांनी असं म्हंटल आहे की “समाजात काही प्राणघातक विषाणू” देखील आहेत. जे समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम करत आहे. हा कोरोनापेक्षा मोठा भयंकर आजार आहे. चुकीचे व्हिडीओ पसरवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की कोरोना व्हायरसपासून मी माझ्या नागरिकांना वाचवेल मात्र त्यानंतर तुम्हांला माझ्या तावडीतून कुणीच वाचवू शकणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये आपण कोरोनाशी लढू आणि जिंकूही त्यामुळे कुणीही समाजात अशांतता निर्माण होईल असे काम करू नका. असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.