जळगाव (प्रतिनिधी) – लोकसंघर्ष मोर्चाचे तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे एकूण आजपर्यंत 100 रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले.

त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला.
त्यावेळी डॉ क्षितिज पवार, डॉ. नर्सेस उपस्थित होते.लोकसंघर्ष मोर्चा च्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे सचिन धांडे , लोकसंघर्ष मोर्चा युवक अध्यक्ष भरत कर्डिले विशाल भाई नाथांनी किरण भोळे, कलींदर तडवी, सुमित साळुंखे दामोदर भारंबे पिंटू राज निंबाळकर आदी उपस्थित होते
लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेने गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज I T I येथे 125 खाटांचे मोफत सी सी सी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी व वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे.येथे रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे
आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात.त्यांच्या मनोरंजनासाठी सीसीसी सेंटरच्या हॉलमध्ये एक टीव्ही पण लावण्यात आलेला आहे
लोकसंघर्ष मोर्चा ने कोविड उपचार घेणाऱ्या व्यक्तींसाठी चविष्ट जेवण सोय सीसी सेंटरला केलेली आहे रोज सकाळी 7.30 ला चहा 9:00 नाश्ता 12.00 दुपारचे जेवण 4.00 चहा रात्री 8.00 रात्रीचे जेवण रात्री 9.00 ला हळदीचे दूध या कालावधीत रुग्णांना चविष्ट जेवण व फळे दूध पुरवले जाते.
यासाठी लोकसंघर्ष मोर्चा चे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.
लोकसंघर्ष मोर्चा जळगाव
युवक जिल्हाध्यक्ष :- भरत राजेंद्र कर्डिले







