जळगाव (प्रतिनिधी) – शेतात काम करत असतांना अचानक रानडुकराने केलेल्या हल्ल्यात ३० वर्षीय शेतमजूर ठार झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कैलास उत्तम नाईक (वय-३०) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हा तरूण शेतकरी आज मंगळवार ३० मार्च रेाजी आपल्या कुटुंबियासह शेतात दादर कापणीसाठी गेले होते. सकाळी ११ वाजता आई वडील पत्नीसह काही मजूरांसक दादर कापत असतांना शेताच्या बांधावर लपलेल्या मोठ्या रानडुकराने अचानक केलेल्या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला जिल्हा रूग्णलयात नेत असतांना आव्हाणे फाट्याजवळ त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील शेतकरी भयभित झाले आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह नेण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मयताच्या पश्चात पत्नी वंदना, आई, वडील उत्तम नाईक आणि तीन अपत्ये दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.







