जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील शिरसोदे ५४ वर्षीय शेतमजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.

याबाबत कैलास काशिनाथ सैंदाणे यांनी पारोळा पोलिसात माहिती दिली आहे की, त्यात म्हटले आहे की, शिरसाेदे येथील शेतमजूर भीमराव उत्तम सैंदाणे यांनी बंधन बँकेचे कर्ज घेतले हाेते. परंतु मागील वर्षी शेतात उत्पन्न न आल्याने कर्ज भरले जात नसल्याने ते नैराश्यात हाेते. कर्ज भरण्यासाठी तगादा लावल्याने त्यांनी पहाटे ५ वाजेपूर्वी केली.







