मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – निमखेडी बु!! येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. हे दवाखान्याला 12 ते 13 गाव लागून आहेत या गावांमध्ये पाळीव प्राणी जास्त आहेत. बैल, म्हैस,मेंढ्या, बकऱ्या, गाई, कोंबड्या, कुत्रे असे अनेक पाळीव प्राणी या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आहेत.
दररोज ची ओपीडी कमीत कमी 30/35 या दरम्यान असते. आणि वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लसीकरण करावे लागते. आणि या कामासाठी या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषध साठा जिल्हा पातळीवरून कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे या परिसरातील सर्व गावांमधील पशुवैद्य सेवा देता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये वाद होताना बर्याच वेळात तू तू तू मी मी होत असते. दुसरी समस्या संपूर्ण बिल्डिंग नादुरुस्त आहे बिल्डिंग पावसाळ्यामध्ये पूर्णपणे स्लॅब गळतो कर्मचारी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा सुद्धा नसते. पूर्ण साहित्य पाण्याने ओले होते. औषधी साठासुद्धा ओला होतो.
पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना बिल्डिंग मध्ये बाथरूम संडास टॉयलेटची व्यवस्था नाही अपूर्ण पूर्ण काम आहे. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही व नळ नाही सेंटेक टाकी बसलेले नाही. त्यामुळे अधिकार्यांना व कर्मचार्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संडास व लघवी नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे केव्हा येईल याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी संडास व टॉयलेटची व्यवस्था केली असतील, गेली पंचवीस वीस वर्षापासून निमखेडी बु!! पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये आहे.
माणसाला जर काही आजारी झाल्यास त्याचा उपचार त्याचे नातेवाईक निमखेडी बु!!ते मुंबई नागपूर येथे जाऊन उपचार करू शकतात. परंतु मुक्के प्राणी यांना तर काही इजा झाली तर त्यांना जवळच्या दवाखान्यात न्यावे लागते त्यांना मुंबई-दिल्ली जाण्याची आवश्यकता नसते कारण ते पाळीव प्राणी मालक त्यांना नेऊ शकत नाही. म्हणून त्यांचा गावपातळीवरच इलाज होत असतो.
निमखेडी बुद्रुक या गावाने गेली पंचवीस वर्षांमध्ये सरपंच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशी अनेक पदे भूषवली आहेत. पंचवीस वर्षे निर्वात ग्रामपंचायत त पासून महाराष्ट्र राज्य केंद्रामध्ये एकाच पक्षाची सत्ता होती. सत्तेचे केंद्र असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे याच मतदारसंघांमधे जन्माला आलेले आहेत. त्याच्या शब्दातील वजन होत, की चांगले चांगले राजकीय लोक त्यांनी पन्नास पन्नास वर्षे सत्ता भोगलेले त्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलेले आहेत मोठे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. भ्रष्टाचार मुक्त केलेले आहेत. आणि त्यांच्या मतदारसंघातील पशुवैद्यकीय दवाखान्याची परिस्थिती व यांच्याच काळामध्ये या दवाखान्याची इमारत मंजूर करण्यात आली होती. परंतु स्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना बांधण्याची मुभा दिल्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घराच्या पायरी ला किती विटा लागतात. हे सांगू शकले नसते त्यांना एक इमारतीचे काम देण्यात आले होते. शासनाच्या पैशाचा गैरवापर झाला असून काहीही फायदा झालेला नाही. इमारती दयनीय अवस्था झालेली आहे. माननीय एकनाथराव खडसे त्यांनाही माहीत नसेल का? असे पशुपालन करते यांचे मत आहे, व
गेली जिल्हा परिषद मध्ये पंचवीस वर्षं सत्ता आहे व पंचायत समितीमध्ये सुद्धा परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी औषध साठ्यासाठी कोणती वाढीव तरतूद करण्यात आलेली नाही ही मात्र दुर्दैवी बाब आहे.
यानिमित्त निमखेडी बु!! येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची परिस्थिती बदलावी व औषध साठा भरीव आणावा ही अपेक्षा महाराष्ट्र राज्य सरकारमधील तरुण तडफदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडून व्हावी अशी अपेक्षा अधिकारी – कर्मचारी पशूपालन नागरिक करीत आहे. या गंभीर बाबीकडे व मुक्क्या प्राण्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी जातीने लक्ष देऊन या मुक्क्या प्राण्यावर दया करावी अशी मागणी या परिसरात जोर धरत आहे.








