
पारोळा (प्रतिनिधी) – रुग्णांचे व्याधीतुन निवारण करुन आजारमुक्तीतुन त्याचे मनोधैर्य वाढविणे ही काळाची गरज आहे.आरोग्य यंत्रणा ही क्षयरोग निर्मुलन करणेकामी प्रयत्नशील आहे.याकामी सर्वेश्वर बहुउद्देशिय विकास संस्था व मनोजालय फाऊंडेशन या सारख्या सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याने सामुहीक प्रयत्नातुन क्षयरोग निर्मुलन करण्याचा संकल्प जागतिक क्षयरोग दिनी घेत कुटीर रुग्णालयात रुग्णांना मास वाटप करण्यात आले.
दरवर्षी कुटीर रुग्णालय मार्फत जागतिक क्षयरोग दिनी विविध कार्यक्रम होत असतात.यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येवुन क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वेश्वर बहुउद्देशिय विकास संस्था पारोळा व मनोजालय फाउंडेशन शिरसोदे ता,पारोळा यांचे संयुक्त विद्यमाने रुग्णांना मास व क्षयरोग बाबत समुपदेशन करण्यात आले.
तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ प्रांजली पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. अधिकारी डॉ.धनंजय पाटील, डाँ प्रशांत सोनवणे,डॉ. प्रियंका बडगुजर, क्षयरोग उपचार पर्यवेक्षक भगवान चौधरी,आय सी टी सी विभागाचे समुपदेशक नामदेव अहिरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बबन महाजन, निलेश माळी, हेमंत आखाडे,सर्वेश्वर संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील,मनोजालय फाऊंडेशन अध्यक्ष विजय मिस्तरी,किसान महाविद्यालयाचे प्रा.प्रदीप औजेकर,शांताराम सुतार,योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी डाँक्टरांनी क्षयरोग बाबत मार्गदर्शन करित रुग्णांची सेवा हेच कर्तव्य समजुन डाँक्टर सेवा देत असतात.त्यामुळे रुग्णांनी काळजी घेत डाँक्टरांचा सल्ला घेवुन उपचार घ्यावेत.असे आवाहन केले.







