*युवक काँग्रेस कडुन सुरवाडा जंगलाला लागलेल्या आगीची चौकशी करुन कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

*युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश दादा पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत व ऊप वन संरक्षक विवेक होशिंग यांना निवेदन…
जळगाव (प्रतिनिधी) – तालूक्यातील गोळेगांव परिमंडळातील सुरवाडा नियतक्षेत्र ५०४ मध्ये लागलेल्या आगीबाबत चौकशी समिती नेमून कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनपील व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व ऊप वनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याकडे निवेदन देत केली आहे. यावेळी सदरील प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याने तातडीने ऊप वनसंरक्षक यांना चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देतो असे निवेदन देते वेळी जिल्हाधिकार्यांनी प्रा.हितेश पाटील यांना सांगीतले.
वन मजूरांकडून रसत्याच्या दुतर्फा पेटविल्याच्या कारणावरुन सुरवाडे जंगलात अनैसर्गिक स्वरुपाचा मानवनिर्मित वणवा लागल्याची घटना दिनांक १४ रोजी घडली होती. यांत साधारणत: ८ हेक्टर जंगलात आग लागल्याची नोंद वन विभागाकडून करण्यात आली होती. आगीत गवत, रानझेंडू, आराटी, रानतूळस, पालापाचोळा, जळीत झाल्यामूळे ८०० रुपये नुकसानीची नोंद करण्यात आली असली तरी यांत जळालेल्या वृक्षांचा ऊल्लेख नसल्याने वनपाल गवळे व वनरक्षक डि ए बेलदार यांच्याकडून पाहणी डोळे झाकून झाली असल्याने कारवाईची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणात मानमोडी, मुक्तळ व सुरवाडे खुर्दचे ऊप सरपंच यांनी वनपाल व वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याबाबत ऊप वनसंरक्षक व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश दादा पाटील, मुक्तळ सरपंच जितू पाटील, सुरवाडे खुर्द ऊप सरपंच निलेश शिंदे, मानमोडी सरपंचपती मोहन पाटील, गजानन पाटील, ऊमेश बिजागरे, नकूल कोळी, निलेश जावरे, गणेश पाटील, युवासेना तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांच्यासमवेत अन्य जण ऊपस्थित होते.







