शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतकरी संघटनेची मागणी !

वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेलले वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकरी साहेबराव फकीरा पाटील, वासुदेव पंडित पाटील, कैलास सोनू पाटील, पांडुरंग माधराव धनगर तसेच साहेबराव शंकर पाटील आदी शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीचे ३२०६ हे वान पेरले होते वेळेवर खत व्यवस्थापन कीटकनाशक पाणी व्यवस्थापन करूनही ज्वारीच्या कणसांना दाणेच भरलेले नाहीत यांच्यासह तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात हाच प्रकार दिसून येत आहे तरी संबंधित शेतकऱ्यांची कृषी विभागाने दखल घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर उपजिल्हाध्यक्ष, सचिन सोनवणे तालुकाध्यक्ष, विनोद धनगर प्रगतशील शेतकरी, गणेश पाटील प्रभाकर शिंदे भुषण पाटील गुणवंत पाटील सागर पाटील अविनाश शिंदे यांनी केली आहे कृषी विभागाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा शेतकरी संघटनाचे जिल्हा अध्यक्ष, संदीप पाटील जळगाव, यांनी दिला आहे .
तसेच हायटेक सिडस् कंपनीचे विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत कंपनी आपली जबाबदारी झटकत आहे तरी कृषी विभागाने याची दखल घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.








