अमळनेर (प्रतिनिधी) – चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संतोष पाटील याने जीपेट(GPAT) 2021मधील परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे.तो चोपडा महाविद्यालयातुन 3 ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण तर अमळनेर तालुक्यातून 2 ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे त्याचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

पत्रकार संतोष पाटील यांचा मुलगा रोहित हा चोपडा येथील बी फार्मसी कॉलेज श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील या महाविद्यालयात तृतीय वर्षीचे शिक्षण घेत आहे.सण 2021 या वर्षी झालेल्या जीपेट(GPAT)या परीक्षेत त्याने नेत्रदीपक यश मिळवले आहे. चोपडा महाविद्यालयातुन 3 रा तर अमळनेर तालुक्यातुन तो 2 ऱ्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
त्याचे अभिनंदन जळगाव जिल्हा काँग्रेस अधक्ष संदीपभय्या साहेब पाटील (चेअरमन), जळगाव युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हितेश सुभाषराव पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे चेअरमन डॉ उल्हास पाटील व अमळनेरच्या काँग्रेसी नेत्या महिला जिल्हा अध्यक्ष सुलोचना वाघ तसेच बहादरवाडी परिसरातून रोहितचे अभिनंदन होत आहे.







