जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील विटनेर येथील शेतकऱ्याच्या शेतातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून गहू, दादरचे पोत्यांसह वीस हजार रूपयांची रोकड असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवारी सायंकाळी उघडकीला आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण नथुसिंग परदेशी (वय-५५), रा. विटनेर ता. जि.जळगाव यांचे जळके – विटनेर शिवारात शेत गट नंबर 499 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी पत्र्याचे पक्के घराचे बांधका केले आहे. दरम्यान शुक्रवारी 18 मार्च रोजी ८ वाजेच्या सुमारास शेतातील घरला कुलूप लावून परदेशी घरी आले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील बंद घरफोडून घरातील १८ हजार रुपये किमतींचे दादर, १७ हजार रुपये किमतीचा गहू, १० हजार रूपये किंमतीचा एलईडी टिव्ही, २ हजार रूपये किंमतीचा होम थिएटर, पिक फवारणीचा विद्यूत पंप आणि मजूरांना मजूरी देण्यासाठी ठेवलेले २० हजार रूपये रोख रक्कम असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २० मार्च रोजी सकाळी उघडकीला आहे. याप्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.







