पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील भिमनगर परिसरात गॅसवर चहा ठेवतांना अचानक गॅसने भडका घेतल्याने घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. पोलीसात आगीची नोंद करण्यात आली.

जयश्री भिमराव साळवे (वय-२५) रा. भिमनगर पाचोरा ह्या १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरात गॅसवर चहा ठेवण्यासाठी गेले असता गॅसचा अचानक भडका होवून लागलेल्या आगीत लाकडी कपाट, अल्युमिनीअमचे भांडे, घरातील सर्वांचे कपडे, फ्रिज, टिव्ही, सर्व इलेक्ट्रिक वस्तू असे हजारो रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राहूल सोनवणे करीत आहे.







