चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरातील संचारबंदी लागू असताना स्वयंवर मंगल कार्यालयासमोर बॅंड चालू असल्याचे पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान कळताच रात्री ११ वाजताच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत बॅंड ताब्यात घेण्यात आले असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू असताना. शहरातील भडगाव रोड परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर रात्री ११ वाजेच्या सुमारास चक्क मोरया बॅंड (गडखांब ता. अमळनेर) सुरू होता. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान ही बाब लक्षात येताच मोरया बॅंडसह सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांची नावे विचारली त्यावर समाधान गुलाब पाटील (बॅंड मालक), सर्जेराव देवचंद भिल, भरत विश्वास सोनवणे, समाधान ज्ञानेश्वर बोरसे, प्रकाश भिका सोनवणे, ऋषीकेश सुनिल सांगोळे सर्व रा. गडखांब, ता. अमळनेर व निवृत्ती तुळशीराम चंदनशिवे, रा. रडावन, ता. अमळनेर असी नावे सांगितली असून शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. सरकारी नियमानुसार संदीप ईश्वर पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.







