रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील भोकरी फाट्याजवळ एका २३ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रावेर पोलीसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भोकरी येथील २३ वर्षीय तरूणी १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता शेतात शौचालयाला जात असतांना संशयित आरोपी सुनिल मिठाराम रायमळे रा. तामसवाडी याने तरूणीचा हात पकडून विनयभंग केला. तर त्याला मदत करणार इम्रान खान इद्रीस खान रा. फतेशाहा पुरा, रावेर याने देखील लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र जैन करीत आहे.







