पाचोरा (प्रतिनिधी) – आज जागतिक महिला दिनानिमित्त शेतात राबणाऱ्या तसेच आपल्या कुटुंबासाठी राबणाऱ्या शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. संघटनेकडून एक पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन महिला शेतकऱ्यांचा संघटनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष मयूर अरुण वाघ यांनी सन्मान केला. संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर हा उपक्रम साजरा केला गेला. यावेळी पाचोरा तालुक्यात महिला शेतकरी मायाबाई वाघ, प्रज्ञा वाघ आणि सखुबाई वाघ यांचा सन्मान करण्यात आला









