जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह देशभरात कोव्हिडं सशुल्क लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. यात शासनाने शहरात लसीकरणासाठी विविध सेंटर जाहीर केले आहे यात जळगाव येथील कांताई नेत्रालय यांनाही अधिकृत कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर चा दर्जा दिला असून 5 मार्च पासून या केंद्रात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन सेवादास दलीचंद जैन व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी लस घेऊन केले. हे सेंटर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी लस टोचुन घेतली आहे. कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी 3 बूथ तयार करण्यात आले असून, कांताई नेत्रालयाच्या आवारात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आणि स्वतंत्र लसीकरण विभाग तयार करण्यात आला आहे. नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे, उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे,

जळगाव येथील जुन्या राष्ट्रीय महामार्ग अर्थात जुन्या पाईप फॅक्टरीत पाच वर्षांपूर्वी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रध्देय भवरलालजी जैन यांच्या कल्पनेतून अद्ययावत नेत्रालय सुरू झाले.या नेत्रालयाच्या आवारात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार व दरानुसार या लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खालील सूचनांचा पालन केल्यावर कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेता येईल. त्यासाठी – ज्येष्ठ नागरिक वय ६० वर्ष आणि जास्त असावे, वय ४५-५९ (with co-morbid conditions) साठी सरकारने जाहिर केल्यानुसार Registered Medical Practioner चे Co-Morbid Medical Certificate सोबत आणणे गरजेचे आहे.ते आपण आणले आहेत का? > online Registration साठी प्राधान्य दिले जाईल. Covid Vaccine साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन झाले असले तरी सरकारची मान्यता व व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शकतो. ज्या मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन केले आहे तो मोबाईल सोबत बाळगणे गरजेचे आहे. कारण व्हेरिफिकेशन कोड त्याच मोबाईलवर येईल. आपल्या ओळखपत्रावर जसे नाव आहे तसेच नाव ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतांना लिहावे.कृपया याची नोंद घ्यावी तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन केले नसेल तर Vaccination slot vacant असल्यास स्पॉट रजिस्ट्रेशन करता येईल.यासाठी ओळखपत्र गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. कोविड प्रतिबंधक लस टोचून घेण्यापूर्वी खालील सूचनांचेही पालन आवश्यक आहे. त्यात ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, श्वास घेण्यास काही त्रास लस टोचणाऱ्या व्यक्तीला नसावा, त्रास असल्यास कोविड लस घेणे टाळावे. कोविडची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ज्यांना लस टोचून घ्यायची आहे अशा व्यक्तीच्या घरी कुटुंबातील सदस्याला गेल्या १५ दिवसात कोरोना झाला आहे का? असेल तर तुमची कोरोना चाचणी झाली आहे का? याची माहिती देणे आवश्यक आहे. कांताईन नेत्रालय आवारात मास्क घालणे आवश्यक आहे तसेच सामाजिक अंतर (Social Distance) राखणे ही गरजेचे आहे.







