मुंबई (वृत्तसंस्था) – आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते, पण ते संपल्यानंतर सगळं पाणी वाहून समुद्राला मिळते. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबतं होतात, योजना पुढे येतात. पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी ज्या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून घेता, याला अधिक महत्त्व आहे. असेच धाडस प्रत्येकांने केले पाहिजे. ‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी हा सल्ला दिला. शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे आणि कोकण सुजलाम सुफलाम करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यात अनेक धरणं, पाटबंधारे झाले, पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे. आज आपण या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. पण, धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे. अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात, पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, अधिकारी, आंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बिळवस-आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालव, मालडीचे सरपंच संदीप आडवलकर, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली, पण, या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कोरोना आला आणि सगळे ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.







