जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील माहेरवाशीणीचा दारू पिऊन शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या औरंगाबाद येथील पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रूक्सारबी शेख अय्युब (वय-२३), रा. डिमार्ट जवळ, जळगाव यांचा विवाह अय्युब शेख युसुफ, रा. औरंगाबाद यांच्याशी एप्रिल २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अय्युब शेख हे सतत दारून पिऊन घरात धिंगाणा घालत होते. दरम्यान मला तू आवडत नाही नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसचे सासू बिबाबि युसुफ शेख , नणेंद सायराबी शेख युसुफ, रा. औरंगाबाद, चंदा यास्मीन शेख भुऱ्या, रा. बालसंगी, जि. बुलढाणा आणि सुलतानाबी शेख सलीम, रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.







