दिग्रस : तालुक्यातील आरंभी येथे किरकोळ कारणावरून मेव्हूण्यानेच भावोजी खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रामेश्वर प्रेमसिंग पवार (३०) रा. आरंभी असे मृताचे नाव आहे. तर गजानन राजूसिंग राठोड (४५) रा. आरंभी असे आरोपीचे नाव आहे
आरोपी गजानन हा मुंबईला असतो. सोमवारीच तो सुरुवातीला येथे आला होता. घरगुती कारणावरून वाद झाल्याने त्याने सेंट्रींगची पाटी रामेश्वरच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.








