• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द ; तत्कालीन संचालक मंडळाकडे पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – कृ.उ.बा. समिती पाचोरा- भडगाव चे सभापती सतीश शिंदे व संचालक मंडळाने मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे प्रशासक नेमणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.सदर याचीके संदर्भात मा.न्यायमूर्ती संजय व्ही.गंगापूरवाला , मा.एस.डी.कुलकर्णी यांनी पाचोरा, जामनेर व अमळनेर बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीचा शासन आदेश पूर्णतः रद्द ठरवून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना सदरील बाजार समित्याच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा निर्णय घेण्याचे आदेशित केले.तो पर्यंत यापूर्वीच्या संचालक मंडळाने बाजार समित्यांचे कामकाज पाहवे व त्यांचा पदभार पुनर्स्थापित केला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कृ.उ.बा. समिती पाचोरा- भडगाव च्या संचालक मंडळाची मुदत १८/९/२०२० रोजी संपली होती. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिलेली होती. त्यामुळे बाजार समिती पाचोरा- भडगाव च्या संचालक मंडळाने ठराव करून दि.१०/९/२०२० रोजी महा.शासन, मा.उपसचिव-सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,मुंबई यांना संचालक मंडळास मुदतवाढ मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

परंतु सदर मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असतानाच घाई गडबडीत शासनाने मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांना दि.२१/९/२०२० च्या आदेशान्वये बेकायदेशीर व राजकीय भेदभाव करून सहा.निबंधक, सहकारी संस्था,पाचोरा यांची बाजार समितीचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

तसेच शासनाने राजकीय हेतूने ज्या बाजार समितीवर महाविकास आघाडीचे संचालक मंडळ कार्यरत होते त्यांना मुदतवाढ दिली व ज्या बाजार समितीवर भा.ज.पा. चे संचालक मंडळ कार्यरत होते त्यांना मुदतवाढ न देता शासकीय अधिकारी यांची बेकायदेशीरपणे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. कृ.उ.बा. समिती पाचोरा- भडगाव चे सभापती सतीश शिंदे व संचालक मंडळाने म. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा कडे प्रशासक नेमणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सदर याचीके संदर्भात म. न्यायमूर्ती संजय व्ही.गंगापूरवाला , म.एस.डी.कुलकर्णी यांनी पाचोरा, जामनेर व अमळनेर बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीचा शासन आदेश पूर्णतः रद्द ठरवून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना सदरील बाजार समित्याच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर पुन्हा निर्णय घेण्याचे आदेशित केले. तोपर्यंत यापूर्वीच्या संचालक मंडळाने बाजार समित्यांचे कामकाज पाहवे व त्यांचा पदभार पुनर्स्थापित केला.

बाजार समिती पाचोरा- भडगाव च्या संचालक मंडळातर्फे मा. उच्च न्यायालयात जेष्ठ विधीतज्ञ अॅड. व्ही.डी.साळुंखे व अॅड.परेश बी.पाटील, अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पहिले. सदर पत्रकार परिषदेत सभापती सतीष शिंदे , उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, संचालक नरेद्र विक्रम पाटील, दिलीप मन्साराम पाटील, सौ.सिंधुताई शिंदे, सौ.सुनंदाताई बोरसे, धोंडू हटकर, सौ.प्रिया संघवी, गनी शाह हे उपस्थित होते.


 

 

Previous Post

युपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याची गरज – संजय राऊत

Next Post

जळगावात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १५ लाखांची लूट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १५ लाखांची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon