मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूंमुळे जगाला गुडघे टेकायला लावले असतील. पण, या झारखंडमधील एका दाम्पत्याने साथीच्या काळात जन्माला आलेल्या आपल्या जुळ्या मुलांची नावे कोरोना आणि कोविद अशी ठेवली आहेत. या दोन शब्दांनी इतरेजनांच्या मनात भीती आणि घृणा निर्माण केली आहे. मात्र, रायपूरमधील एका दाम्पत्याला मात्र कोरोनाच्या भयावर हे जुळे म्हणजे मिळवलेला विजय, असे वाटत आहे. त्यामुळे त्यांनी या जुळ्यांची (मुलगा आणि मुलगी) नावे कोरोना आणि कोवीद अशी ठेवली आहेत. जे जुळे 26-27च्या मधयरात्री जन्माला आले. मला मुलगा आणि मुलगी असा दुहेरी आशिर्वाद देवाने दिला आहे. त्यामुळेच आम्ही त्यांची नावे सध्या कोरोना (मुलगी) आणि कोविद (मुलगा) अशी ठेवली आहेत, असे या जुळ्यांची 27 वर्षीय माता प्रीती वर्मा यांनी सांगितले. या साथीने अनेक जणांचे प्राण घेतले आहेत, हे खरे आहे. त्याचवेळी निर्जंतुकीकरण, स्वच्छतेच्या सवयी या साथीने लावल्या आहेत. याचबरोबर अनेक चांगल्या सवयीसुध्दा या संकटाने लावल्या आहेत, हे नाकारता येत नाही, असे त्या म्हणाल्या.