जळगाव;- महापालिका शिवसेना गटनेता तथा नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आपल्या गटनेतापदाचा राजीनामा आज शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे दिला असून महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार भोवला असल्याचे म्हटले जात आहे.
ते पुढे म्हणाले की, महापालिकेत भाजपाच्या महापौर भारती सोनवणे यांचा जाहीररित्या सत्कार केला.हि बाब शिवसेना पक्षाचे इतर नगरसेवक आणि पक्षश्रेष्टीच्या लक्षात आल्याने बंटी जोशी हे अडचणीत आल्याची चर्चा मनपा वर्तुळात होती . गेल्या अडीच वर्षांपासून आपण महापालिकेत शिवसेना गटनेता म्हणून उत्तम काम केले आहे. चुकीचा मॅसेज वरिष्ठांपर्यंत पोहचल्यामुळे आपण आपल्या गटनेता पदाचा राजीनामादेत असल्याचे बंटी जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.