मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटनाचा सामना करतेय. राखीच्या सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. यासंदर्भातील एक पोस्ट सुद्धा राखीने आपल्या इंस्टारग्रामवर शेअर केली होती.
‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत’ या आशयाची भावनिक साद राखीने आपल्या फॅन्सला घातली होती. मंगळवारी (दि. २३) रात्री उशीरा राखी सावंतने आपल्या आईचे दोन फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, काल राखी सावंतने तिच्या आईचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये राखीची आई अभिनेता ‘सलमान खान’चे आभार मानताना दिसत आहे. त्यानंतर राखीने नुकताच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेता सोहेल खान या व्हिडीओमध्ये राखीला म्हणत आहे की, ‘माय डिअर राखी.., तुला आणि तुझ्या आईला कुढल्याही प्रकारची गरज लागत असेलतर, तू सरळ मला फोन कर.मी तुझ्यासोबत आहे.
मी तुझ्या आईला भेटलो नाही पण मला हे नक्की माहिती आहे की, राखी स्ट्रॉन्ग आहे मग तुझी आईही तुझ्यापेक्षाही स्ट्रॉन्ग असणार.मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल आणि सर्व व्यवस्थित होईल. या आशयाची पोस्ट राखीने केली आहे.







