नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- आज संपूर्ण जग आणीबाणीच्या अवस्थेत आहे, सगळीकडे अनिश्चितता, भीती दिसते आहे. अशा परिस्थितीत काही लोक निराश होतात तर काही सकारात्मक विचार जोपासून काही नविन शिकण्यास इच्छुक आहेत. जर आपण दैनंदिन जीवनातील थोडा वेळ एक ध्यान अभ्यास शिकण्यात खर्च केला तर तुमच्या मन आणि शरीराला लाभ होईलच सोबतच, ही तुमची प्रतिकारक शक्ति देखील वाढवेल, असा विश्वास माझ्यासह जगभरातील लाखो साधकांना आहे. वुहानमध्ये देखील ही साधना पद्धती कोरोनाव्हायरसच्या विरुद्ध प्रभावी ठरली आहे.
आम्ही तुमचा परिचय फालुन दाफा साधना पद्धतीशी करू इच्छितो. विश्वाचा सर्वोच स्वभाव सत्यता, करुणा, सहनशीलता या तत्वावर आधारित फालुन दाफा (फालुन गोंग) ही मन आणि शरीराची उच्च स्तरीय साधना आहे. फालुन दाफामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकवले जातात. परंतु मनाची जोपासना करण्यावर किंवा नैतिक गुणांची जोपासना करण्यावर भर दिला जातो. हे व्यायाम व्यक्तिच्या शक्ति वाहिन्यांना उघडणे, शरीराचे शुद्धीकरण करणे, तणाव मुक्त करणे तसेच आंतरिक शांतता प्रदान करण्यास सहायता करते. मन आणि शरीराच्या सौवर्धंनाचा एक परिपूर्ण अभ्यास असल्या कारणाने या अभ्यासामुळे लोकांना अल्प वेळेतच आश्चर्यकारक स्वास्थ्य लाभ प्राप्त होतात.
टेक्सासच्या बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिनच्या इम्युनोलॉजीचे प्राध्यापक डॉ. लिली फेंग यांच्या संशोधनानुसार, फालुन दाफा आजारांविरूद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रभावी ठरली आहे. डॉ. लिली फेंग यांनी श्वेत रक्त पेशीं (न्युट्रोफिल) चे जीवन काळ आणि कार्यांची तपासणी केली, ज्यामध्ये असे आढळले की, फालुन दाफा साधकांच्या न्यूट्रोफिलचे इन-विट्रो जीवन काळ नियंत्रण समूहांच्या तुलनेत 30 पट जास्त होते आणि ते अधिक चांगले कार्यरत होते. हे काही रोगांसाठी प्रतिकारक आणि आरोग्य लाभ दर्शविते.
मास्टर ली होंगझी यांनी मे 1992 साली फालुन दाफा प्रथम चीनमध्ये सार्वजनिक केले. आज फालुन दाफा 114 पेक्षा जास्त देशांत 10 करोडहून अधिक लोकांमध्ये लोकप्रिय आहे. परंतू दुःखद गोष्ट अशी की चीन, जी फालुन दाफा ची जन्मभूमी आहे, तिथेच फालुन दाफा आणि फालुन दाफा साधकांवर अमानुष छळ केल्या जात आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या नास्तिक विचारसरणीमुळे, चीन शासकांना फालुन दाफा ची वाढती लोकप्रियता त्यांच्या सत्तेसाठी एक आव्हान वाटू लागले आणि 20 जुलै 1999 रोजी यावर बंदी घातली आणि क्रूर दडपशाही सुरू केली जी आजपर्यंत सुरु आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून, वुहान कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचे केंद्रस्थान आहे, जिथे ८१,००० रुग्ण नोंदविले गेले आहेत, ज्यात सुमारे ३२०० लोकांचा मृत्यु झालेला आहे. ही चीनची अधिकृत संख्या आहे, तर तज्ञांच्या मते, मृत्यूंची वास्तविक संख्या 10 पट जास्त असू शकते. चीन मध्ये मोबाइल सेवा देणार्याच ३ कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात चीन मध्ये 2 करोड पेक्षा जास्त मोबाइल कनेक्शन बंद झाले आहेत. तेव्हा येवढ्या मोठ्या जनसमुदायाचं झालं तरी काय हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच चीनी कम्यूनिस्ट सरकारच्या विश्वासार्थतेवर शंका उपस्थित होते.
अशा कठीण परिस्थितीतही वुहानमधील फालुन दाफा साधकांनी न केवळ स्वत:ला या महामारी संक्रमणापासुन वाचविले आहे तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटात वेढलेल्या वुहान रहिवाशांपर्यंत फालुन दाफाचे स्वास्थ लाभ आणि सत्य, करुणा सहनशीलता चा संदेश पोहचवित आहेत. वुहानच्या फालुन दाफा साधकांचा हा नि:स्वार्थ आणि कौतुकास्पद प्रयत्न नक्कीच जगातील लोकांना माहिती करून द्यायला हवा.
“Life and Hope Renewed – The Healing Power of Falun Dafa”
या पुस्तकात फालुन दाफा अभ्यास द्वारा अनेक लोक गंभीर आणि प्राण घातक आजारांपासून कसे मुक्त झाले यावर त्यांचे अनुभव संकलित आहे. हे पुस्तक तुम्ही http://en.minghui.org/html/articles/2005/4/3/59184.html वरून डाऊनलोड करू शकता.
फालुन दाफा अभ्यास भारतातील बहुतेक सर्व मोठ्या शहरांमध्ये निःशुल्क शिकविल्या जातो. याविषयी अधिक माहितीसाठी, कृपया बघा : www.falundafa.org किंवा www.falundafaindia.org








