दहिगाव ता. यावल :- जिल्ह्यात 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या सूचनेनुसार अंगणवाडी , प्रा. शाळा , विद्यालय , महाविद्यालय बंद असल्याने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम (NDD) मोहिमेमध्ये 1 मार्च 2021 रोजी आशा सेविका ,अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन प्रत्यक्ष व समक्ष स्वतः जंतनाशक गोळी खाऊ घालणार आहेत.
त्यासाठी सदर आशां , अंगणवाडी सेविका यांची रॅपिड एंटीजन किट द्वारे कोविड-19 चाचणी दोन दिवसात प्रा. आ. केंद्र स्तरावर करून घेणे बंधनकारक असुन त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेवर त्या आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जंतनाशक मोहीम गावपातळीवर राबविण्यात येऊन मोहीम यशस्वी करण्यात यावी. अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या.
त्याप्रमाणे ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व प्रा. आ. केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील उपकेंद्र सावखेडासिम , दहिगाव , मोहराळा , सातोद व कोळवद येथील 25 अशा सेविकांचे रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आले.या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या.
समूह आरोग्य अधिकारी डॉ.खालीद शेख , डॉ. रोशन आरा डॉ.राहुल गजरे व डॉ. साजिद तडवी , यांनी स्वॅप घेतले व त्यांना संजय तडवी , राजेंद्र बारी व बालाजी कोरडे यांनी मदत केली.








