वॉशिंग्टन: – वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाचा गुप्तचर यंत्रणेचा एक अहवाल अमेरिकेने डिक्लासिफाइड केला असून त्यात सांगितलंय की इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती.अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या गोपयस्फोटने एकच खळबळ उडाली आहे.
जो बायडेन प्रशासनाने इंटेलिजेन्स रिपोर्ट डिक्लासिफाइड करुन सर्वात मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. जो बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे मध्य-पूर्व आशियामध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. हा अहवाल ट्रम्प यांच्या कार्यकालात आला होता. पण ट्रम्प यांचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संबंध लक्षात घेता तो जाहीर केला नव्हता. या अहवालामुळे आता अमेरिका आणि सौदी अरब या दोन देशांदरम्यानच्या संबंधात आता तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.